अर्चना संगीत विद्यालयाचे ३३ वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दि.चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता आय एम ई आरच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.स्नेहसंमेलनात सुर एक रंग अनेक हा संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.पोवाडा, जानपद गीते,गोंधळ ,कव्वाली,विविध भाषेतील गीते,दासर पद,कबिराचे दोहे आणि नृत्य आदी कार्यक्रम संगीत विद्यालयाचे विद्यार्थी सादर करणार आहेत.
स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दिलीप चिटणीस, प्रा. प्रणव पित्रे,चार्टर्ड अकांऊटंट संजीव अध्यापक,उद्योजक महेश इनामदार,अनिल चौधरी उपस्थित राहणार आहेत असे संगीत विद्यालयाच्या संचालिका अर्चना बेळगुंदी यांनी कळविले आहे.