ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात 30 कामगार जखमी
बेळगांव:रस्त्यात अचानक आडवे आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात तीस कामगार जखमी झाले.पुणे बंगलोर महामार्गावर होसुर येथे हा अपघात घडला.रोजगार हमी योजनेच्या कामगारांना घेऊन ट्रक यमकनमर्डी येथून हिडकलला निघाला होता.रस्त्यात अचानक बुलेट स्वार आडवा आल्यामुळे ट्रक चालकाने त्याला वाचवताना ट्रक पलटी झाला.अपघातात जखमी झालेल्या कामगारांना त्वरित रुग्णवाहिकेतून बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
बहुतेक कामगारांना हाता पायाला आणि डोक्याला मार बसला आहे.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींपैकी एका महिलेची स्थिती अत्यवस्थ असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली आहे.