25 वी हरे कृष्ण रथयात्रा उत्साहात पार
येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ(इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली 25 वी हरे कृष्ण रथयात्रा उत्साहात पार पडली .
आज दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौकातून या रथयात्रेस प्रारंभ झाला .सुरुवातीला इस्कॉनच्या ज्येष्ठ संन्याशांच्या उपस्थितीत रथयात्रेस हिरवा बावटा दाखविण्यात आला .
याप्रसंगी हजारो आबाल वृद्ध स्त्री-पुरुषाकडून रथ ओढला गेला .यावेळी भव्यरथामध्ये राधाकृष्ण आणि गीताई गौर भगवान यांच्या मूर्ती होत्या .त्यानंतर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड ,रामलिंग खिंड गल्लीमार्गे कमलेश्वर ओवर ब्रिजवरून ही रथयात्रा शहापूर मधून नाथ पै सर्कल कडून कंकणवाडी कॉलेज मार्गे गोवा वेसला पोहोचली .त्यानंतर तिथून इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ मंदिरच्या परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता पोहचली .त्यानंतर याठिकाणी विविध कार्यक्रमाचे पार पडले .
या रथयात्रेत दरवर्षीप्रमाणेच यंदाही देशाच्या विविध भागातून आणि खास करून बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले भाविक सहभागी झाले होते .विविध ठिकाणी सर्वांना सरबत, फळे वितरित करण्यात आले तसेच रथावर ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती .