ॲपटेक एव्हिएशनच्या १२ विद्यार्थांची बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमातळासाठी निवड
बेळगांव:एव्हिएशन क्षेत्राचे शिक्षण पूर्ण बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमातळावर काम करण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी बेळगांव शाखेचे व्यावसायिक भागीदार विनोद बामणे,स्वरवस्ती इन्फोटेकच्या एम.डी.ज्योती बामणे उपस्थित होत्या.मान्यवरांच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हिरेबागेवडी येथील इरान्ना पट्टीहाल, दांडेली येथील विजय मंनवड्डार, गोकाक मधील मुत्तेप्पा दांडीन, हिडकल ड्याम येथील संद्या राजू, शहापूर बेळगांव येथील संजीवनी मालवी, आझम नगर बेळगांव येथील अफ्रीन पटेल,हिडकल ड्याम येथील रक्षिता लायगर, सौंदत्ती येथील उदय कुमार तलवार, मारीहाल येथील महेक पीरझादे, हुक्केरी येथील साक्षी कापसे, बिदर येथील जयश्री राठोड यांची निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार व कार्यासाठी शुभेच्या देण्यात आल्या.