टोल नाक्यावर २ कोटी रक्कम जप्त
हिरे बागेवाडी टोल नाक्यावर निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या तपास पथकाने आणि पोलिसांनी दोन कोटी रुपयांची रक्कम पहाटे साडे तीन वाजता जप्त केली.
मुंबईहून मंगलोर कडे निघालेल्या खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता एका व्यक्तीकडे दोन कोटी रुपयांची रक्कम आढळून आली.या रक्कमेच्या बाबत त्या व्यक्तीकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्याला पोलिसांनी अटक केली.
दोन कोटी रुपयाची बेहिशोबी रक्कम मिळाल्याचे कळताच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी देखील हिरे बागेवाडी टोल नाक्याला भेट देऊन माहिती घेतली.या रक्कमेच्या बाबतीत आयकर खात्याला माहिती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.या संबंधी हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून चोवीस तास तेथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसात रोख रक्कम आणि मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत.