| Latest Version 9.0.7 |

Education NewsLocal News

*॥ वाढदिवसाचे औचित्य साधून 300 विद्यार्थ्याना ओळखपत्र , टाय व बेल्ट वाटप ॥*

*॥ वाढदिवसाचे औचित्य साधून 300 विद्यार्थ्याना ओळखपत्र , टाय व बेल्ट वाटप ॥*

॥ वाढदिवसाचे औचित्य साधून 300 विद्यार्थ्याना ओळखपत्र , टाय व बेल्ट वाटप ॥
ग्राप सदस्य प्रशांत पाटील यांचा कौतुकास्पद उपक्रम
कंग्राळी खुर्द – या गावचे ग्राप सदस्य व मराठा साम्राज्य स्पोर्टस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मराठी शाळेतील 300 विद्यार्थ्यांना ओळखपत्र , टाय व बेल्ट वाटप केले या त्यांच्या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे .

मराठी शाळेच्या प्रांगणात आज दिनांक 14 ऑगष्ट रोजी झालेला या कार्यक्रमांत प्रारंभी जे .एस . पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात उद्देश सांगितला . यावेळी एसडीएमसी व उपस्थित मान्यवरांच्या वतिने प्रशांत पाटील यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशांत पाटील यांच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक करताना नि. मुख्या टी डी पाटील शाळेचे मुख्या . श्री कोलकार सर , ग्राप सदस्य केंपान्ना सनदी , एसडीएमसी अध्यक्षा मिनाक्षी मुतगेकर यांनी मनोगतातून सामाजातील इतर लोकांनीही त्यांचा आदर्श घेऊन असे विधायक उपक्रम राबवावेत असे आवाहन करून त्यांना शुभेच्छा दिल्या .

प्रशांत पाटील यांनी शुभेच्छा देणार्या सर्वांना धन्यवाद देऊन यापुढेही असे सामाजिक , शैक्षणिक व क्रिडा उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करू असे सांगितले . त्यानंतर त्यांनी मराठा साम्राज्य स्पोर्टस क्लबच्या माध्यमातून आपल्या वाढदिवशी मराठी शाळेतील इ 1 ली ते 7 वी पर्यंतच्या सर्व जवळपास 300 विद्यार्थांना प्रत्येकाचे ओळखपत्र , टाय व बेल्टचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण केले . यावेळी ग्राप सदस्य राकेश पाटील, यशोधन तुळसकर, विनायक कम्मार , महेश धामणेकर मा. जवान सोमनाथ पाटील, जोतीबा पाटील , मनोहर पाटील, प्रविण पाटील, सुहास पाटील, ओंकार पाटील , मयूर पाटील निखील पाटील , सुशांत जाधव , एस डी एमसी उपाध्यक्षा पौर्णिमा मोहिते सदस्या तेजस्वीनी पाटील परशराम पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक , शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते . शेवटी शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊन आर एस पाटील यांनी आभार मानले .
* अलीकडे बरेच लोक वाढदिवसाचे औचित्य साधून वारेमाप खर्च करून नको त्या गोष्टी करतात पण आमच्या गावचे ग्राप सदस्य प्रशांत पाटील यांनी गेल्या तीन चार वर्षात वाढदिवसा दिवशी बसथांबा सुशोभिकरण , शाळा व्हरांडा दुरुस्ती , गरजूना मदत या वर्षी विद्यार्थ्याना ओळखपत्र , टाय व बेल्ट वाटप करून समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे . त्याचा इतरांनीही बोध घ्यावा . – सोमनाथ पाटील (मा. जवान )
** माझ्यासाठी प्रत्येक दिवस खास आहे . दररोज काही ना काही वेगळे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न असतो . गेली तीन चार वर्षे वाढदिवसा दिवशी मराठा साम्राज स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून असे उपक्रम राबवत असून यापुढेही कायम असणार आहेत . – प्रशांत पाटील ( ग्रा प सदस्य व संस्थापक अध्यक्ष मराठा साम्राज्य स्पोर्ट क्लब कंग्राळी खुर्द )


Deepak Sutar
the authorDeepak Sutar
WhatsApp

Don’t Miss Out! Join Our WhatsApp Group Today!

Get the latest news, updates, and exclusive content delivered straight to your WhatsApp.

Powered By KhushiHost

";