बेळगाव: दि १६ डिसेंबर २०२४ रोजी शानभाग हॉल , गणेशपुर रोड बेळगाव येथे झालेल्या बेळगाव जिल्हा कराटे संघटना व कंप्लीट कराटे अकॅडमी यांच्यावतीने १४ व्या आंतरशालेय व महाविद्यालयीन कराटे स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये बेळगांव जिल्ह्यातून एकूण ६८० कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बेळगांव जिल्हा शिक्षण विभागाचे जिल्हाक्रीडा शिक्षण अधिकारी
श्री. ए.ए.पटेल व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री.गजेंद्र काकतीकर,उपाध्यक्ष श्री. रमेश अलगुडेकर,जनरल सेक्रेटरी श्री. जितेंद्र काकतीकर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार ,प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा ,अक्षय परमोजी, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, लक्ष्मीकांत आनंदाचे, चंदन जोशी, कृष्णा जाधव, परशुराम नेकनार, रातिक लाड,उषा गौडर या सर्वांचे सहकार्य लाभले.