आपत्कालीन पूरस्थिती नियंत्रण व व्यवस्थापन याचे 1 दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर
एच ई आर एफ रेस्क्यू टीम बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखालीआयोजित बजरंग दल प्रखंड व सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी यांच्यामार्फत रविवार दिनांक 30 रोजी निपाणी येथे आपत्कालीन पूरस्थिती नियंत्रण व व्यवस्थापन याचे 1 दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
सदर शिबिर उद्या रविवारी दिनांक 30 जुलै रोजी सकाळी ११ वाजता जवाहरलाल तलाव येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी निपाणी व निपाणी परिसरातील सर्व युवक व युवतीने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अजित पारळे ,बबन निर्मले, अमोल चेंडके,. युवराज जाधव ,प्रवीण चव्हाण, अतिश चव्हाण, यांनी केले आहे