*चव्हाट गल्ली मराठी शाळेत अध्ययन महोत्सव उत्साहात संपन्न..*
बेळगाव येथील सरकारी मराठी शाळा नं.5 चव्हाट गल्ली क्लस्टर मध्ये *अध्ययन महोत्सव* हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रथमतः ढोल ताश्याच्या गजरात शाळेच्या परिसरातून प्रभात फेरी काढन्यात आली. प्रभातफेरी मध्ये विविध वेशभूषा करून आलेल्या विध्यर्थ्यानी तसेच रथामध्ये भारतमाता व इतर वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले.
https://fb.watch/iabdQeeT4t/
उदघाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानी श्री एस.एस.हादीमनी तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक श्री संगोळ्ळी व माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक किल्लेकर आणि दैहिक शिक्षणाधिकारी श्रीमती जे.बी.पटेल उपस्थीत होते.
याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री राजू बेळगुंदकर यानी प्रास्ताविकेतून शिक्षण विभागाच्या नावीण्यपूर्ण कार्यक्रमाची माहिती देताना हा कार्यक्रम म्हणजे मुलांच्या सृजनशीलतेचा विकास करणारा आणि त्यांच्या मनातील विविध प्रश्नांतूनच त्यांची प्रज्ञा विकसित करणारा एक नाविन्यपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत दोन दिवस मुलांना ओरिगामी, गाणी,गोष्टी तसेच विज्ञानातील गमती जमती यांचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी अथिती भाषणातुन नगरसेवक श्रीअफरोझ मुल्ला यानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेछा व्यक्त केल्या.
माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक किल्लेकर यानी सरकारच्या या नविन योजनेचे कौतुक करताना याचा पुरेपुर लाभ विध्यर्थ्यानी घ्यावा तसेच शिकलेले ज्ञान त्यांनी इतर विद्यार्थ्यांना वाटावं असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री हदिमनी यानी कार्यक्रमची रुपरेषा सांगून दोन दिवसाचे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी व्यासपिठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री पी.के.मुचंडिकर, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी श्री रवी नाईक, श्रीकांत कडोलकर, श्री सनदी, श्री भास्करी तसेच चव्हाट गल्ली केंद्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रवी सर यांनी केले तर आभार हरीकृष्णा नाथबुवा यांनी मानले.