कंग्राळी खुर्द – येथील ज्योतीनगर मेन रोडचे रस्त्यावरील धोकादायक खांब नागरीकांच्या मागणी नुसार हेस्कॉमच्या वतिने स्थलांतरीत करून नगरीकांना दिलासा दिला आहे .
या परीसरात दोन खांब रस्ता रुंदीकरण करण्यात आल्या नंतर रस्त्यावरच आले होते त्याच . प्रमाणे अंडर ग्राउंड विदयुत व पुढील वस्तीसाठी नवीन दोन खांबाचीआवश्यकता होती त्यामुळे गणराज युवक मंडळ ज्योतीनगर च्या कार्यकत्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचेकडे या कामासाठी निवेदन दिले होते त्यानुसार तात्काळ कार्यवाही होऊन हेस्कॉम कर्मचारयांनी आज हे काम युद्ध पातळीवर करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
यावेळी मंत्रीमहोदयांचे खाजगी सहाय्यक सद्दाम मुल्ला , कार्यकर्ते मोहन कांबळे , विनायक राजगोळकर , सागर मनवाडकर , प्रशांत सुतार , आकाश पाटील , गजानन गोडसे , विकास पाटील दत्ता गाडेकर , प्रशांत पाटील , विनायक बेळगांवकर ,गणेश डुकळे यांनी सदर कामावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहुन काम करणाऱ्या हेसकॉम कर्मचाऱ्यांना सहकार्य केले .