“मरेन पण वाकणार नाही” : मराठा समाजाचा 2 अ मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघातर्फे आंदोलन बेळगांव,
दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी, कोंडुसकोप्प येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा महावकुटाच्या वतीने मराठा समाजाचा 3 ब मधून 2 अ मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी बंगळुरू येथील गविपुर मठाचे मराठा स्वामी श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील हजारो तरुण, तरुणी, महिला व नेत्यांनी आंदोलन केले .
आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्री श्री मंजुनाथ स्वामीजी म्हणाले की, मराठा समाज राज्यात आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे, समाजाचा विकास करायचा असेल तर मराठा समाजाचा समावेश 3B मधून 2A मध्ये करणे आवश्यक आहे. 2A मध्ये समावेश करण्यासाठी समाज सुमारे पाच वर्षांपासून आंदोलन करत आहे. मराठा समाज हा सर्व समाजाला एकत्र आणणारा समाज आहे, या समाजाने देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे, त्यामुळे मराठा समाजाचा गुणवंत विकास व्हावा यासाठी सरकारने तातडीने 2A आरक्षण देण्याची मागणी स्वामीजींनी केली आहे.
आंदोलनामध्ये आमदारांपैकी अनिल बेनके, श्रीमंत पाटील, अभय पाटील, दुर्योधन ऐहोळे, महादेवप्पा यादवाड, गणेश हुक्केरी, समाजप्रमुखांपैकी किरण जाधव, धनंजय जाधव तसेच अनेक मराठा प्रमुख आणि माझी संसद प्रकाश हुक्केरी यांच्या समवेत सिद्धू सौदी, मारुती अष्टगी तसेच हजारो संख्येने मराठा समाजाचे नागरिक तसेच सर्व पक्षाचे राजकीय नेते उपस्थित होते.