मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे आता आर आय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. यापूर्वीचे अध्यक्ष तानाजी पाटील यांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र संगनमताने ही निवडणूक रद्द करून बिनविरोध आर आय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नवीन यांनी काम पाहिले. यावेळी कारखान्याचे जबिअल्ला के., शिवाजी सुंठकर यांची उपस्थिती होते.
यावेळी संचालक सुनील अष्टेकर, जोतिबा अंबोलकर, चेतक कांबळे, बसवंत मयानाचे, बाबासाहेब भेकणे, बाबुराव पिंगट, शिवाजी कुट्रे, बसवराज गानगेर, लक्ष्मण नाईक, युवराज पावले, वनिता अगसगेकर, वसुधा मालोजी, शिधाप्पा टुमरी, युवराज पावले, चीफ अकाउंट ऑफिसर आप्पासाहेब बल्लोरी, सिडिओ अरुण पाटील, जिनगौडा, उमेश चौगुले उपस्थित होते. नामनिर्देशन आर आय पाटील, सूचक म्हणून आप्पासाहेब भेकणें तर अनुमोदक म्हणून बसवंत मायानाचे यांनी काम पाहिले. सुरेश अगसगेकर हे ही यावेळी कारखान्याचे उपस्थिती होते.
आर आइ पाटील यांनी मार्कंडेय साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा कणा आहे, माझ्यावरती दिलेलं जबाबदारी हे सर्वाना विश्वासात घेऊन पुढे चालू अश्या प्रकारे आश्वासन दिले.