बेळगाव:धर्मराज गल्ली शर्यत मंडळ यांच्यावतीने खास दीपावलीनिमित्त आयोजित केलेल्या एका माणसाने 50 किलो वाळूचे पोते घालून लाकडी बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस देवलापूर येथील नागेश नायक यांनी पटकाविले. त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून मेंढा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक कंग्राळकर हे होते. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि उद्योजक अभिषेक पाटील यांच्या हस्ते फीत कापून शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि अध्यक्ष लक्ष्मी मासेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेश फोटोचे पूजन माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी आणि सुप्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर परशराम व्यंकट पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवप्रतिमा पूजन भात व्यापारी रणजीत गोरल आणि कृष्णा बिजगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान प्रतिमा पूजन विनोद पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य शशिकांत धुळजी यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी या शर्यतीचे आयोजन दीपावली पाडव्यानिमित्त करण्यात येते. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धर्मराज गल्ली, शर्यत मंडळ येल्लूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सतीश आर. पाटील यांनी केले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:-
प्रथम क्रमांक- नागेश नायक, देवलापूर 303 फूट 2 इंच, द्वितीय क्रमांक- सिद्धेश्वर प्रसन्न, येरमाळ 293 फूट 3 इंच, तृतीय क्रमांक बसवेश्वर प्रसन्न संतीबस्तवाड 293 फूट, चौथा क्रमांक – सिद्धेश्वर प्रसन्न , मुचंडी 291 फूट 11 इंच, पाचवा क्रमांक चव्हाटा प्रसन्न – कणबर्गे 291 फूट दोन इंच, सहावा क्रमांक मंगाई देवी प्रसन्न , वडगाव 289 फूट अकरा इंच, सातवा क्रमांक यल्लमा देवी प्रसन्न, कक्केरी, 287 फूट एक इंच, आठवा क्रमांक सिद्धेश्वर प्रसन्न , 284 फूट, नववा क्रमांक- दानेश्वरी प्रसन्न, एम के हुबळी 275 फूट, दहावा क्रमांक- बीस्टा देवी प्रसन्न , कक्केरी 271 फूट दहा इंच , अकरावा क्रमांक – सुनील पाटील, जाफरवाडी, 266 फूट तीन इंच.