आ अभय पाटिल यांच्या हस्ते ई सायकल बाईकचे लोकार्पण
बेळगावच्या नागरिकांना दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सायकल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर करून नागरिक आपले आरोग्य सुदृढ बनविणारा आहेतच त्याशिवाय प्रदूषण नियंत्रित राहण्याकरिता हातभार लावणार आहेत.
आज 300 हून आधी सायकल उपलब्ध करून देण्याचे काम अभय पाटील यांनी केले आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक सायकल आणि पायडल सायकल असा समावेश असून अर्धा तास एक तासा करिता नागरिकांना सायकल वापरायचे असल्यास त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत.
जे पादचारी आहेत त्यांना या सायकल उपलब्ध करून घेता येणार आहेत. ही सेवा बेळगाव मध्ये सुरू करण्यापूर्वीच सर्वत्र सायकल ट्रॅक देखील निर्माण करण्यात आले आहेत.
तसेच पर्यावरणाचा प्रदूषण रोखण्याकरिता या सायकलीचा वापर होणार असून यामुळे पेट्रोल डिझेल यासारखे इंधनाचा वापर कमी होणार आहे तसेच पर्यावरणाला पूरक वातावरण सायकलींमुळे निर्माण होणार असल्याचे मत यावेळी अभय पाटील यांनी डी मिडीयाशी बोलताना सांगितले.