शिवछत्रपती है मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअपच्या, इंस्ट , रील, व्हिडिओ, स्टेटस सिनेमांचां मधून समजत नाहीत. त्यांनी तर त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी बलिदान दिलेल्या गडकिल्ल्यांवर जाऊन कार्य समजून घ्यावे. आणि आजच्या तरुणांनी गडकिल्ले व ग्रंथ यांच्या सहवासात राहिले पाहिजे शिवरायांचे गड, किल्ले तरुणांसाठी स्फूर्ती केंद्रे आहेत, तेथे गेले की आपल्या मध्ये देशासाठी, समाजासाठी त्याग करण्याची वृत्ती निर्माण होते असे मत शिवतपस्वी डॉ. संदीप माहिद गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले. बुगटे अलुर येथील दत्त मंदिर येथे शिवछत्रपती यांच्या दिव्य पादकांच्या आगमनप्रसंगी ते बोलत होत शिवछत्रपती होते म्हणून आज आपली ओळख हिंदू म्हणून राहिलो. छ्त्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत त्यांच्या साठी आपल्या सर्वाचे आचरण हे मावळ्या सारखे असले पाहिजे तरुणांनी दिसण्या पेक्षा आचरणावर लक्ष दिले पाहिजे तसेच श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग महास्वामी नी हिंदू हेल्प लाईन चा माध्यमातून देव, देश धर्माचे कार्य करण्यासाठी निपाणी तालुक्यात निःस्वार्थ तरुणांची फळी निर्माण करत आहेत. हे कार्य लाखमोलाचे आहे, या कार्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन संदीप महिद्रजी गुरुजी यांनी केले.
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म स्थान किल्ले शिवनेरी हून दिव्य पदुका आषाढी वारी साठी पंढरपूर येथे विठ्ठल चां भेटी साठी निघतात तेथून या पादुका जिथे जिथे हिंदवी स्वराज्या साठी बलिदान केलेल्या मावळ्यांच्या समाधी ला भेट देण्यासाठी जात असतात हा42दिवसाच्या संपूर्ण प्रवास असतो यावेळी या दिव्य पादुका नेसरीची खिंड येथील प्रतापराव गुजर यांच्या समाधीस भेट घेवून हिंदू हेल्प लाईन चे प्रमुख सागर श्रीखंडे यांच्या मार्गद्शनाखाली आलूर या गावी आल्या होत्या यावेळी सर्वप्रथम आगमन बुगटे आलूर येथे झाल्यावर आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर वारकरी संप्रदाय व श्री दत्त भजनी मंडळ यांच्या वतीने दिंडी काढून पादुकांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भारत मत, यांच्या जय घोष करून तरुणांनी परिसर दुमदुून सोडला या नंतर श्री दत्त मंदिर येथे प. पू. प्रभुलिंग स्वामीजी आणि शिवतपस्वी डॉ. संदीप महिंद्रजी गुरुजी यांचे ग्रामस्थ कडून स्वागत करण्यात आले..
यावेळी चौका-चौकात पादुकांचे महिलां कडून पुष्प उष्टी करून व रांगोळी व पाणी घालून स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा ग्रुप, हनुमान तालीम मंडळ, भगव्या रक्षक, महेश नलवडे युवा मंच, युवा स्टार तरुण मंडळ, त्रिमूर्ती तरुण मंडळ, दत्त पंती भजणी मंडळ,वारकरी सांप्रदाय, ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य याचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाला ग्रामस्थ व शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाच्या लाभ घेतला.