बेळगाव: क्लब सर्कल ते हनुमान सर्कल ते हिंडलगा गणपती मंदिर पर्यंतच्या रोडच्या रिकार्फेटिंगसाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून पीडब्ल्यूडी मधून ४ कोटीचे अनुदान मंजूर झाला असून आज बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आमदार असिफ राजू शेठ म्हणाले की हा रस्ता ८ वर्षांपूर्वी माझे मोठे भाऊ माजी आ फिरोज शेठ यांनी बनवला होता. त्यानंतर आता या रस्त्यामध्ये छोटे-मोठे खड्डे दिसत आहेत यासाठी पीडब्ल्यूडी अनुदानातून ४ कोटी रुपये मंजूर करून आम्ही या रस्त्याच्या रिकार्फेटिंगच्या विकास कामाला सुरुवात करत आहे. आणि येत्या ३० तारीखच्या आत मध्ये हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले.
https://www.facebook.com/share/v/eRh78vXxWBT6uyaU/
याप्रसंगी युवा नेते अमन सेठ,नगरसेवक संदीप जिर्गीहाल,माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे,दिनेश देशपांडे,राहुल मैत्री,सलीम खातीब, कंत्राटदार संदीप, कार्यकारी अभियंता,पीडब्ल्यूडी अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, स्थानिक रहिवासी उपस्थित होते.