॥ वाढ दिवसाचे औचित्य साधून बसथांब्याचे नुतनीकरण ॥
कंग्राळी ग्राप सदस्य प्रशांत पाटील यांचा विधायक उपक्रम
कंग्राळी खुर्द – या गावचे ग्रा प सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील बस थांब्याचे नुतनीकरण करून एक विधायक उपक्रम राबविला आहे .
या गावातील बसथांबा 30 वर्षापूर्वी बांधला होता तो पूर्णपणे मोडकळीस आला होता . विशेष करून विद्यार्थी व महिलांना शेजारचे हॉटेल , दुकाने यांचा आसरा घ्यावा लागत होता . याची दखल घेऊन प्रशांत पाटील यांनी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान , मराठा साम्राज्य स्पोर्ट क्लब व अन्य मित्र मंडळी याच्या सहकार्याने 14 – 15 जणांना बसता येईल असे कठडे व तेवढ्याच जणाना उभे राहता येईल इतक्या जागेत फरशी बसवून वरती पत्रे घालून रंगरांगोटी करून बस थांब्याचे नुतनीकरण केले या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या सुरवातीला मार्कंडेय साखर कारखाना उपाध्यक्ष आर. आय पाटील , रमेश पाटील यांनी छ शिवाजी महाराज मुर्ती पूजन तर मा जि प सदस्या सरस्वती पाटील , ग्राप सदस्या रेखा पावशे, सुनिता जाधव , भाग्यश्री गौंडवाडकर यांनी विविध फलकांचे पूजन केले . सागर पाटील व वस्ताद कृष्णा पाटील यांनी ध्वजारोहण केले तर उपस्थित विद्यार्थी , मा अध्यक्ष यल्लापा पाटील , भाऊ पाटील, वैद्यकीय प्रतिनिधी रणजीत पाटील , व ग्राप सदस्यांनी फीत कापून बस थांब्याचे उद्घाटन केले . उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना जन्म दिवस , लग्नाचा वाढदिवस अशा कार्यक्रमांना असे विधायक उपक्रम राबवा असे आवाहन करून प्रशांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या . विविध संघटना , ग्रा.प तसेच मित्र मंडळींनीही बुके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी उपस्थित मान्यवर , प्रचार प्रसार माध्यम प्रतिनिधी , बस थांबा तयार करण्यासाठी सहकार्य केलेले कारागीर याचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला ग्रा प सदस्य केंपान्ना सनदी , वैजनाथ बेन्नाळकर , राकेश पाटील , विनायक कम्मार , महेश धामणेकर , यशोधन तुळसकर , गावडे कमिटीचे किरण पाटील , आप्पाजी पाटील श्री शिव प्रतिष्ठानचे गजानन पाटील, शिवभक्त मनोहर पाटील , अजय पाटील, किरण पाटील यांचेसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते . सुत्र संचालन टी.डी पाटील यांनी तर आभार पशू डॉ सुहास पाटील यांनी मानले .
* या बस थांब्याचे नुतनीकरण स्मार्ट सीटी , लोक प्रतिनिधी करणार अशी गेली 5 वर्षे पोकळ आश्वासने मिळत होती . परंतु वाढदिवस औचित्याने योग आला त्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे तर एसटी महामंडळ अधिकारयांनीही सकाळी भेट देऊन कौतुक केले तसेच गर्दी पाहून सकाळी एक जादाची बस कंग्राळी पर्यंत सोडण्याचे आश्वासन दिले .