कंग्राळी खुर्द – शासकीय नियमांनुसार कायद्यामध्ये मोठे बदल झाले असून ते नागरिकांना समजण्या साठी गावांत एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वतीने जागृती बैठक घेण्यात आली .
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत येथे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरवातीला सदस्य राकेश पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले त्यानंतर
एपीएमसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मंजूनाथ बजंत्री यांनी माहिती देतांना आता सरकारकडून कायद्यात फार मोठेबदल करण्यात आलेले आहेत एखाद्याने तक्रार केल्यानंतर त्याची लागलीच शहनिशा करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे . खोटी तक्रार केल्यास तक्रारदारांवरच कारवाई होणार . गावात तसेच प्रत्येक गल्लीत शांतता कशी राहिल यासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित असून त्या संदर्भात ही कडक नियम तयार करण्यात आले आहेत असे सांगितले . यावेळी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित करतांना गावात अमली पदार्थ विक्री , तरुणांमधील वाढलेली व्यसनाधीनता , लक्ष्मी मंदिर चोरी तपास , मुलांमधील कबूतर पाळण्याचे वाढलेले प्रमाण , मराठी शाळेच्या क्रिडांगणावर रात्रीच्या वेळी चाललेली कृत्ये या बाबींकडे लक्ष वेधले असता त्यांनी गस्त वाढवून या सर्व बाबींवर नियंत्रण आणू तसेच श्री लक्ष्मी मंदिर चोरी प्रकरणी तपास सुरू असून लवकरच गुन्हेगार पकडले जातील असे आश्वासन दिले . यावेळी माझी ग्रा.अध्यक्ष भाऊराव पाटील माझी उपाध्यक्ष विधामन सदस्य केंपन्ना सनदी , सदस्य प्रशांत पाटील यशोधन तुळसकर सिद्धाप्पा माळगी तसेच गावातील सर्व गणेशोत्सव उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचलन व उपस्थितीतांचे आभार ग्रा. सदस्य प्रशांत पाटील यांनी केले.
D Media 24 > Local News > *॥ कंग्राळी खुर्द येथे बदल झालेल्या कायद्या बाबत जागृती ॥* पोलिस उपनिरीक्षकांच्या समवेत ग्रामस्थ बैठक संपन्न
*॥ कंग्राळी खुर्द येथे बदल झालेल्या कायद्या बाबत जागृती ॥* पोलिस उपनिरीक्षकांच्या समवेत ग्रामस्थ बैठक संपन्न
Deepak Sutar28/07/2024
posted on
Leave a reply