॥ अलतगा येथे आज रूद्राभिषेक व महाप्रसाद ॥
कंग्राळी खुर्द – अलतगा ता बेळगांव येथील ग्रामदेवत श्री ब्रम्हलींग मंदिराच्या आवारात श्रवणी सोमवार चे औचित्य साधून आज सोमवार दिनांक 26 ऑगष्ट रोजी रूद्राभिभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थानी दिली आहे .
गेल्या चार वर्षापासून सुरू झालेल्या या धार्मिक कार्माच्या निमित्ताने सकाळी ग्रामस्थांच्या वतीने सद्राभिषेक होईल हा विधी भाविक यल्लापा चिकलकर (पिंटू ) या भाविकाच्या सहकार्यातून होणार असून अन्य भाविकही अभिषेक करणार आहेत त्या नंतर दुपारी 12 वाजता केपीसीसी सदस्य मलगोंडा पाटील , मा .जिप उपाध्यक्ष अरुण कटांबळे व काकती पोलीस स्टेशन चे पि एस आय मंजूनाथ हुलकुंद यांचे हस्ते पूजन करून महाप्रसाद वाटपाला सुरवात होईल तरी गावासह परिसरातील नागरिकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे .