बेळगाव | प्रतिनिधी
मातोश्री कॉलनीच्या वतीने, काँग्रेस नेते संदेश राजमाने यांच्या पुढाकाराने बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ व अमान शेठ यांचा शाल व हार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी कॉलनीतील नागरी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
मदनी मोहल्ला अन्नपूर्णा वाडी परिसरात जसे रस्ते, गटारी, व अन्य विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली, त्याच धर्तीवर मातोश्री कॉलनीतील कामेही त्वरीत हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांच्या तर्फे राजमाने यांनी निवेदनाद्वारे आमदारांकडे केली.
यावेळी बोलताना आमदार असिफ राजू शेठ यांनी मातोश्री कॉलनीतील रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन यासह सर्व विकास कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. “कोणत्याही भागाचा विकास हा माझा प्राधान्यक्रम असून, येत्या काळात मातोश्री कॉलनीत सुसज्ज नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करून कामे मार्गी लावली जातील,” असे आमदारांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी निहाल होस्मनी स्थानिक नागरिक उपस्थित होते.