This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चौथीत शिकणाऱ्या एका मुलीला व्हीलचेअर भेट*


चौथीत शिकणाऱ्या एका मुलीला व्हीलचेअर भेट

‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या वतीने बेळगांव येथील शासकीय उच्च प्राथमिक कन्नड शाळा, शास्त्री-नगर येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका मुलीला व्हीलचेअर भेट देण्यात आली. कार्यकर्त्यानी शाळेच्या शिक्षिकांना अगोदर न कळवता अचानक या शाळेला भेट दिली, मुलीच्या आईलापण (ज्या सदर मुलीची दैनंदिन काळजी घेतात) आश्चर्यचकित करण्यासाठी थोड्यावेळाने शाळेत आमंत्रित करण्यात आले आणि या छोट्या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते व्हील-चेअर हस्तांतरित करण्यात आली.

व्हिक्टर फ्रान्सिस, नंदिनी फ्रान्सिस, भूपेंद्र पटेल, प्रसाद हुली, डॉ.संजय आडाव, के.एल.कुलकर्णी आणि माई पाटील या मान्यवरांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात मुलीला व्हील-चेअरचे वाटप करण्यात आले. शाळेच्या वर्ग शिक्षिकेलाही न कळविता आल्याने त्यांनाही आश्चर्य वाटले, कार्यक्रम संपला पण आभार मानायचे कोणाचे हेच माहित नाही, सारेच अनोळखी ! संस्थेचे नाव आणि देणगीदारांचे नाव माहीत नव्हते, शेवटी त्यांनी व मुलीच्या आईने संस्थेचे नाव विचारून सर्वांना धन्यवाद दिले. या छोटेखानी कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, सहशिक्षका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या आणि सहकारी सामाजिक संस्थांच्या मदतीने आपण सर्व स्वयंसेवक अशा निवडक गरजू गरीब मुला-मुलींना मदत करू असे राहुल पाटील यांनी सांगितले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply